महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन. दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे