गरिबांचे मसिहा विवेक पंडीत यांचा वसईत गौरव समारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वसई, दि. ०१ नोव्हेंबर : गरीब, पददलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि शोषित यांना न्याय आणि सन्मान मिळवून देणासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना आदिवासी क्षेत्र समीक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. हे पद कॅबिनेट दर्जाचे आहे.

पालघर जिल्ह्यातून यापूर्वी कुणालाही हे पद मिळालेले नाही.

जन आंदोलन समिती वसई आणि विवेक पंडीत मित्र मंडळ द्वारा ५ नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता वसई पश्चिम येथील पार्वती सिनेमॉल च्या मागे साईनगर मैदानात विवेक पंडीत यांचा भव्य गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक मॅकेंझी डाबरे, आनंद पाटील, मिकी आनंद आणि शेखर धुरी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

lead newsVivek Pandit