फुटबाॅल स्पर्धेत विवेकानंदपूर टीम प्रथम

द्वितीय क्रमांक जी.पी.एल मुलचेरा टीम ता तृतीय क्रमांक गोविंदपूर टीम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुलचेरा, 27 ऑक्टोबर :-  गेल्या सात दिवसापासून विवेकानंदपूर क्रीडा संकुलात सुरू फुटबाॅल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत विवेकानंदपूर टीम ने प्रथम, जी.पी.एल मुलचेरा टीम ने द्वितीय तर गोविंदपूर टीम ने तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाची अध्यक्षता माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला, अहेरी इस्टेटचे राजकुमार अवधेबाबा, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, माजी पंस सदस्य सुभाष गणपती, ग्रापं सदस्य दयाल दास, बादल शाह, संतोष उरेते, विकास उईके, दिलीप आत्राम, विष्णू राफय, अपूर्व मुजूमदार, दीपक बिश्वास, निखिल हलदार, संजीव सरकार, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, किशोर मलिक, अक्षय खिराटकार, सजीव हलदार आदि उपस्थित होते.

यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त विवेकानंदपूर टीम ला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या कडून तीस हजार रूप्ये आणि ट्राॅफी देण्यात आली. दुसरा स्थान प्राप्त जी.पी.एल मुलचेरा टीम ला शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला यांच्या कडून वीस हजार रूपये आणि ट्राॅफी,   तिसर्या क्रमांक प्राप्त गोविंदपूर टीमला माजी सभापती युधिष्ठीर बिश्वास यांच्या कडून दहा हजार रूपये आणि ट्राॅफी देण्यात आली. चौथ्या क्रमाकाचे बक्षीस दयाल दास यांक्ष्या कडून आनंदग्राम टीम ला पाच हजार रूपये आणि ट्राॅफी देण्यात आली. कार्यक्रमाला गावातील नागरीक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

competitionfirst infootballteamVivekanandpur