कोणीही यावे आणि आम्हाला काहीही म्हणावे एवढे आम्ही सोपे नाही – बच्चू कडू

अमरावतीत बच्चू कडू याचे जोरदार शक्तीप्रदर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती,  01 नोव्हेंबर :- आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेल तर सोडत नाही अस म्हणत कोणीही यावे आणि आम्हाला काहीही म्हणावे एवढे आम्ही सोपे नाही. प्रहारचा वार त्यांना सोसणार नाही. जलीको आग कहते है म्हणत बच्चू कडू यांनी भाषणाला सुरूवात केली. साडेतीनशे गुन्हे डोक्यावर घेउन फिरतो, उगाच बच्चू कडू 4 वेळा निवडून येत नाही. सत्ता गेली चुलीत आमचा पक्ष आंडूपांडूचा पक्षा नही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. आपली पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. याकरीता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात वादळ उठवले आहे. खुद्द देवेंद्र फडणवीसांना बच्चू कडू यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन कले. त्यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. दरम्यान, आम्ही उगाच गुवाहटीला गेलो नाही. यावेळी माफ करतो, यापुढे करणार नाही असा त्यांनी थेट इशारा दिला. मंत्रीपद सोडल पण मुद्दा सोडला नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केले जात आहे. पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय, पण यापुढे अशी आगळीक घडली कर पुन्हा माफी नाही असा स्पष्ट संदेश ही दिला आहे.

हे देखील वाचा :-

 

 

BachuKadu