केंद्राकडून आम्हाला फुल ना फुलाची पाकळी येईल असे वाटत होते, पण अजून काही आलेलं नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या वीस लाख कोटींच्या पॅकेजमधून फूल ना फुलाची पाकळी मिळेल अस वाटत होत पण अजून काही आलेलं नाही, ही मदत कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. ५ अप्रिल: आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातलं काहीच आलं नाही. शेवटी ते देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेलं पॅकेज आहे. त्यामुळे केंद्र सरकार कडून आम्हाला फुल ना फुलाची पाकळी येईल असे वाटत होते. पण अजून काही आलेलं नाही, अशी खंत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सांगलीच्या विटा येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. केंद्र सरकार कडून जीएसटीची रक्कम यायला उशीर व्हायला लागला आहे. बरेच पैसे प्रलंबित आहेत. त्यामुळे काही प्रश्न तयार झालेत. असं स्पष्ट करत मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जगाचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय. परदेशात लॉकडाउन आणि राबवलेली धोरणे याच त्यांनी वारेमाप कौतुक केलं आहे. पण त्यांनी त्यात भारताचा उल्लेख केलेला नाही. भारताचा उल्लेख न केल्या मुळे मला थोडी शंका आली. त्यांनाही असे वाटत असावे की, परदेशात जशी धोरणे राबवण्यात आली, तशी भारतात राबवली गेली नाहीत. असेच त्यांना सूचित करायचे असावे, अशी उपरोधक टीका जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

jayant Patil