भव्य दिव्य सभा मंडप तयार करून पुढच्या वर्षी रामायण संमेलन करू; आमदार कृष्णा गजबे

कोचिनारात दोन दिवसीय धार्मिक सस्वर मानस स्पर्धेचे आयोजन, १७ वर्षापासून दरवर्षी सुरू आहे महोत्सव, गावातील पाच अधिकाऱ्यांचे सत्कार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

कोरची, दि. २४ डिसेंबर : पुढच्या वर्षी भवदिव्य सभा मंडप तयार करूनच जय मा दंतेश्वरी मानस प्रचार समितीच्या वतीने दोन दिवसीय सस्वर मानस गायन रामायण स्पर्धेचे आयोजन करू असे आवाहन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी कोरची तालुक्यातील कोचिनारा येथे २४ व २५ डिसेंबर या दोन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी अध्यक्ष नगरसेवक मनोज अग्रवाल, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, आनंद चौबे, प्राचार्य देवराव गजभिये, डॉ. शैलेंद्र बिसेन, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, पत्रकार नंदकिशोर वैरागडे, राहुल अंबादे, नगरसेवक मेघश्याम जमकातन, जीवन भैसारे, सरपंच सौ सुनीता मडावी, उपसरपंच रूपराम देवांगन, सौ हेमंताबाई शेंडे, माजी सभापती सौ सुशीलाताई जमकातन, ग्रामसेवक दामोदर पटले आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील छत्तीसगड सीमेलगत कोरची तालुक्यातील कोचिनारा येथे छत्तीसगड छत्तीसगड राज्यातील २० रामायण मंडळी स्पर्धेमध्ये सहभागी आहेत.

कोरची तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असल्याने या भागातील लोकांचे छत्तीसगड राज्यासोबत बेटी-रोटीचे व्यवहार आहेत तसेच या भागातील लोकांचे बोलीभाषा ही छत्तीसगढी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात छत्तीसगढी व हिंदी भाषेत छत्तीसगडमधील रामायण मंडळी स्पर्धेत भाग घेत असून संपूर्ण वाद्य ही स्पर्धकांची असतात. एका टीम मध्ये दहा च्या आत स्पर्धक असून प्रति स्पर्धकाला ४५ मिनिटे वेळ दिला जातो.

यावेळी रामायण कथा सांगून कथेला अनुसरून भजन गितगायले जातात मागील १७ वर्षांपासून सदर कार्यक्रमाचे आयोजन येथील गावकरी करीत आहेत. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोचिनारा येथिल पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक झालेले अशोक कराडे, लेखापाल चेतन जमकातन, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, एम बी बी एस निलेश दूधकवर, नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले शिक्षक जितेंद्र सहाळा यांचा सत्कार आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी कोचीणारा ग्रामपंचायत ही आय एस ओ आहे ही विकासाची तळमळ या गावातील लोकांनी दाखवून दिली आहे याबरोबर गावात एक वाचनालय व व्यायामशाळा सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी योगदान दिले तर यासाठी माझ्याकडून पाहिजे ते मदत केली जाईल प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बरेच निवेदन दिले जाते परंतु वाचनालय व व्यायाम शाळा सुरू झाली तर चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण केले जाईल व सुदृढ नागरिक निर्माण होतील असे आमदार गजबे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रुपराम देवांगन, संचालन नमुदेव गायकवाड तर आभार पोलीस पाटील श्रावण गावडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष समशेर पठाण उपाध्यक्ष दयालू बढईबंश, सह उपाध्यक्ष कांताराम चमकातन, सचिव बसन भक्ता, सहसचिव कार्तिक देवांगन, पवन कोराम, कोषाध्यक्ष सखीलाल बागडेरिया, प्रताप सुवा, संचालक नमूदेव गायकवाड, किशोर कराडे, संरक्षक खोरबहारा नायक, पुरुषोत्तम सहाडा यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 28 डिसेंबर रोजी