आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकरी अडचणीत

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील आठवडी बाजार भरविण्यास प्रतिबंध घातल्याने शेतकरी सापडले अडचणीत.  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १६ मार्च: कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यास प्रतिबंध घातला असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  

उपलब्ध सिंचनाचा वापर करून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. भाजीपाला शेतातून काढून तो रोजच्या रोज विकावा लागत असतो. भाजीपाला नाशवंत असल्याने तो घेतला नाही तर मग गुरांना खाऊ म्हणून घालावा लागतो. शेतकरी शेतात रात्रंदिवस राबराब राबतो मात्र आठवडी बाजार बंद असल्याने त्यांना भाजीपाला विक्रीवर मर्यादा आल्या आहेत.

ग्रामीण भागात भाजीपाल्यास पुरेशी किंमत मिळत नाही. त्यांना यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते मात्र आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडले आहेत

gadchiroli district