लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 27 ऑक्टोबर :- एकनाथ शिदे यांना समर्थन देणाऱ्या ५० आमदारांना खरचं ‘५० खोके’ दिले का? हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कारण कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत. सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आम्ही त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडू यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील ५० आमदारांनी स्वतःहून एकनाथ शिदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या ५० आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत. विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो. त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या आरोपांमुळे केवळ मीच नाही तर सबंध ५० आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली. राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे जवळेचे आहोत असं सांगत असतात. त्यामुळे त्यांचा आऱोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि स्टंटबाज आणि दलाल रवी राणा यांना समज देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
तसेच, माझे आजपर्य़ंतचे राजकारण हे कायम संघर्षाचे राहिले आहे. सत्ताधा-यांविरोधात राहिले आहे. मला सत्तेचा मोह कधीच नव्हता आणि नाही. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो. असले खोटे आरोप मी कधीही सहन करणार नाही. अत्यंत गरिबीतून आणि काबाड कष्ट करुन मी माझ्या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर चार वेळा आमदार झालो आहे. जनतेनं दिलेल्या या पुण्याईवर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रय़त्न केला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांना विनंती आहे. की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करवी. जेणेकरून हे आरोपांचे मभळ दूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामधील संघर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा :-
https://youtu.be/msdpvOp5b0o
https://youtube.com/shorts/Cw_Uc3i6fcU?feature=share