लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्याच्या अकोली या गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून गेल्या १४ तारखेपासून अचानक गरम पाणी येत असल्याने अचानक पाण्यात बदल झाल्याने विहीरीचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे.
विशेष म्हणजे या विहिरी शेजारी काही अंतरावरच दुसरी विहीर आहे, त्यातून सामान्य पाणी येत आहे, गेल्या चार दिवसांपासून या विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने गावातील व परिसरातील नागरिक ही विहीर बघण्यासाठी गर्दी करत आहेत, पाणी अतिशय गरम असून हे पाणी अंघोळीसाठी वापरताना त्यात थंड पाणी घ्यावं लागतं, अस गावातील नागरिकांचा दावा आहे.
त्यामुळे या गावात विविध चर्चांना उत आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात येणार असल्याचे सरपंचांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा :
तीन दिवसांनंतरही पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास