सहाव्या हप्ता केव्हा मिळणार ?. लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा !

अडीच लाखा लाभार्थी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारने राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत १५00 रुपये  महिना देण्याची योजना सुरु केलेली होती. व  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पाच महिन्यांचे ७ हजार ५०० रुपये राज्यभरातील महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच देण्यात आलेले होते.

त्यानंतर विधानसभा  निवडणुकीमध्ये महायुती सरकारने जाहीर केलेल्या २,१०० रुपयांच्या वाढीव अर्थसाहाय्य देण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यामुळे आता महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत १५00 रुपये की २१00 रुपये मिळणार याबाबत महिलांना वेध लागले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत २ लाख ६१ हजार १५७ महिलांचे अर्ज मंजूर असून  या महिलांना वाढीव अर्थसाहाय्याची प्रतीक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात जवळपास १ लाख ८० हजारांहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला होता. दरम्यान, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना १ हजार ५०० रुपयांऐवजी २ हजार १०० रुपये प्रतिमाह देण्याचे जाहीर केले होते. आता महायुतीचे सरकार आरूढ झाल्यामुळे महिलांना वाढीव अर्थसाहाय्य केव्हा मिळणार, याबाबत उत्सुकता होती. हिवाळी अधिवेशनाचे सूप शनिवारी वाजले. अधिवेशन संपताच महिलांना अर्थसाहाय्य वितरित केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे. आता महिलांना १ हजार ५०० मिळणार की २ हजार १०० रुपये याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

हे पण पहा,