शिंदे गटात जाणारे ते दोन खासदार कोण ?

आज शिंदेचा ठाकरेंना दे धक्का ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 5 ऑक्टोबर :-  शिवसेना खरी कुणाची? दसरा मेळावा कुणाचा गाजणार ? अशी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे दोन खासदार फुटणार ? अशी चर्चा सुरू झाली असून ते दोन खासदार कोण यासाठी थोडे थांबावे लागेल.

ठाकरे आणि शिंदे गटांच्या आजच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी राज्यातून रवाना होत आहे. शेकडोंच्या संख्ये शिंदे गटाचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक मुंबईत येत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे असं काय करणार? याची उत्सुकता लागली होती. आता शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आज होणार आहे. तर मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची पूर्ण तयारी झाल्याचं बोललं जातंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार हा मुंबईचा असू शकतो. तर दुसरा खासदार हा मराठवाड्यातील असू शकतो, असा मोठा दावा तुमाने यांनी केला आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यानंतर हे खासदार आणि आमदार कोण आहेत, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हे पण वाचा :-