मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना का केला फोन ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06,ऑक्टोबर :-  काल महाराष्ट्राने शिवसेनेचे दोन मेळावे पाहिले. या मेळाव्याच्या निमित्ताने पोलीस दलाने मात्र चोख कामगिरी बजावली. कोणताही गोंधळ न होता दोन्ही मेळावे शांततेत पार पाडले. त्यासाठी मुंबई पोलिसांना सॅल्युट !

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीच्या मैदानावर झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता मेळावा झाल्यानंतरची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून मोठा वाद झाला होता. हा वाद अखेर न्यायालयात पोहोचला आणि तेथे शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला. पण त्याआधी पालिकेने पोलिसांच्या अहवालानुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल असे सांगत परवानगी नाकारली होती.

बीकेसी मैदानावर झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला २ लाखांची गर्दी होती असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यासाठी १ लाखांची गर्दी होती, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान या दोन्ही दसरा मेळाव्यात कोणताही राडा झाला नाही. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात यश आले. दसरा मेळावा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस दलाने केलेल्या या कामगिरीची दखळ घेतली आणि त्यांचे कौतुक देखील केले.

दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रचंड ताण असुनही मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून मानले पोलीस दलाचे आभार मानले.

हे देखील वाचा :-

धक्कादायक : वांद्रे – वरळी सी लिंकवर भयंकर अपघात

CM eknath shindemumbaimumbai police