शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी-शहा येणार ? चर्चेला उधाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 23 सप्टेंबर :-  दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, शिंदे यांचा आणखी एक दिवसाचा मुक्काम वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे.या मुक्कामादरम्यान मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांना देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यात शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

हे पण वाचा :-

Amit shahbjpdasra melavashivaji parkshivshena