लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गणेशपुरी, 15 ऑगस्ट 2023 : देशभरात ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा लक्ष वेधणारा स्वातंत्र्योत्सव पार पडला, ज्यांना स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी केवळ वेदना, भूक, बेरोजगारी आणि अठराविश्व दारिद्रय दिले आशा कष्टकरी बांधवांचा हा अनोखा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रमजीवी संघटनेच्या मध्यामातून गेली चाळीस वर्षे सातत्याने हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत आहे. वज्रेश्वरी ते गणेशपुरी अशी भव्य मिरवणूक यावेळीही काढण्यात आली. यावेळी श्रमजीवीचे संस्थापक आणि राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनीही ठेका धरला.
या मिरवणुकीत ठाणे,पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक जिल्हयातील हजारो आदिवासी, श्रमजीवी तरुण, तरुणी, बालकं, ज्येष्ठ नागरिक यावेळी सहभागी झाले होते. गेली चाळीस वर्षे विविध मान्यवर या कार्यक्रमाला हेजेरीलावत असतात. यावर्षी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार होत्या मात्र त्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांनी ऑडिओ कॉल द्वारे संवाद साधला.
यावेळी विवेक पंडित यांच्या संघटना बांधणीच्या सर्व डावपेच आणि आयुधांचा कृतियुक्त तपशील आसलेल्या “माणूस म्हणुन जगण्यासाठी” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विमल परेड या ज्येष्ट आदिवासी महिलेच्या हस्ते करण्यात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासींचा एकत्र येऊन होत असलेला हा झेंडावंदन भारतातील एकमेव रेकॉर्डब्रेक कार्यक्रम असून गेली चाळीस वर्षे विविध मान्यवर या कार्यक्रमाला हेजेरीलावत असतात. यावर्षी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार होत्या मात्र त्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांनी ऑडिओ कॉल द्वारे संवाद साधला. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 36 वर्ष उलटलेली तेव्हाही येथील आदिवासी बांधव वेठबिगारीत, पारतंत्र्यात होता, तेव्हा स्वातंत्र्य हा शब्दही ज्याने ऐकलं नाही, राष्ट्रध्वज पहिला नाही अशा भारतीयांना घेऊन आम्ही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, स्वातंत्र्याची किंमत आम्ही स्वातंत्र्य भारतात मोजली आहे, हे स्वतंत्र आता सरकार हिसकावू पाहत आहे हे कधीही होऊ देणार नाही, दुसऱ्या स्वातंत्र्याचे आम्ही सैनिक आहोत, आमच्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्या साठी दिलेल्या बलिदानाची आम्हाला जाणीव आहे, 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ज्या राज्यकर्त्यांनी ,धनाड्यानी लुटले त्यांच्याविरोधात आमच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी लढायला तयार असल्याची प्रतिज्ञा आम्ही आजच्या दिवशी करत असतो, असे यावेळी संस्थापक तसेच राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी सांगितलं.
आजच्या दिवशी मला माझ्या श्रमजीवी बांधवाना भेटून, त्यांच्याशी हस्तांदोलन करून माझ्या खऱ्या भारत देशाला पाहिल्याचा, स्पर्श केल्याचा आनंद मिळतो असे भावोद्गार पंडित यांनी यावेळी काढले. स्थलांतरित विशेषतः कातकरी बांधवांचीअवस्था अत्यंत बिकट आहे, या आदिम बांधवांना ना राहायला घर नाही, जमीन नाही म्हणूनच या दिवशी आपण स्वतःलाच वचनबध्द करू पुढील १५ ऑगस्ट पर्यंत कोणताही कातकरी आदिवासी बांधव घरापासून ,मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही. असे पंडित यांनी सांगितल.
या ठिकाणी आपण श्रमजीवी बांधव एक दिलाने, स्वयंस्फूर्तीने कोणत्याही निरोपाशिवाय येत असतात, ही एक कुटुंब एकत्र असल्याची भावना आहे. सोबतच ही लढाई आहे, सन्मानाची, भुकेची, खऱ्या स्वातंत्र्याच्या प्रकाशाची, ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असे प्रतिपादन यावेळी श्रमजीवीच्या कर्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित यांनी केले. विधानपरिदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऑडिओ कॉल वरून संवाद साधताना त्यांनी श्रमजीवी संघटनेच्या संघर्षमय वाटचालीचा उल्लेख करत कौतुक केले. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते केवळ कार्यकर्ते नसून स्वातंत्र्यवीर आहात, तुम्ही लढता म्हणून लोकांना न्याय मिळत असतो म्हणून तुम्ही लढत रहा असे त्यांनी सांगितले.
यावेळी विवेक पंडित यांच्या संघटना बांधणीच्या सर्व डावपेच आणि आयुधांचा कृतियुक्त तपशील आसलेल्या माणूस म्हणुन जगण्यासाठी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ सभासद विमल परेड यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक केवळ पुस्तक नवे सामाजिक दस्तऐवज आहे असेही त्या म्हणाल्या. संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विनोद मालदे आणि नरेश शर्मा या संघटनेच्या हिताचिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रस्तावना कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित यांनी तर सूत्रसंचालन गणेश उंबरसडा, राजेश चन्ने आणि चंद्रा जाधव यांनी केले. श्रमजीवी संघटनेच्या स्वयंसेवक टीम ने तसेच गणेशपुरी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चोख पणे पार पाडल्याने हजारोंच्या उपस्थितीत देखील कार्यक्रम सुरळीत पार पडला.
कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ, कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित,उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर,विजय जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, सुरेश रेंजड तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा :-