शेतकरी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगत शेती करावी – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

सांसद आदर्श ग्राम येवली येथे कृषी संजीवनी उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 28 जून : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी संजीवनी मोहीम तथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावा-गावांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत शेती करण्याचे धडे दिल्या जात आहेत. हा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम असून ग्रामीण भागातील महिलांनी या तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगतशील शेती करावी व शेतीत विविध पिके घेऊन आपल्या उत्पन्नात भर पाडावी व आपला विकास साधावा, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.

सांसद आदर्श ग्राम येवली येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिलांसाठी आयोजित शेतीशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुढे बोलताना खा. अशोक नेते यांनी सांगितले की, आज उन्नत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असून शेतकरी महिला असे तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करण्याकडे वळत आहेत तथा माझ्या सांसद आदर्श ग्राम मधील महिलांचा कल आधुनिक शेतीकडे असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला असून ही गौरवाची व अभिमानाची बाब असल्याचे खा. अशोक नेते यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बऱ्हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कदम, भाजपचे गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, येवलीचे सरपंच युवराज भांडेकर, उपसरपंच प्रितम गेडाम, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भांडेकर, ग्रा. पं. सदस्य चोखाजी बांबोळे, महिला शेतकरी कविता गेडाम, किरण चचाणे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहणे, कृषी पर्यवेक्षक दिहारे, चलकलवार, कृषी सहाय्यक किर्ती सातार, कृषी विज्ञान केंद्राचे बुद्धेवार, बसवाडे, मोरेश्वर भांडेकर, काशिनाथ भांडेकर, श्रीकांत भांडेकर व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

याप्रसंगी महिला शेतकऱ्यांना गादी वाफे, ऐंझोला वाफे बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांना बोरूच्या बियाण्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले.

हे देखील वाचा :

भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उद्योजकांना वीज दरात सबसिडी देण्यास शासन अनुकूल – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 

ashok netelead story