तहसील कार्यलयातील 23 कर्मचारी पॉजिटिव्ह आल्याने कामकाज थांबले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. १७ मार्च: बुलढाणा जिल्ह्यात झपाट्याने कोरोना वाढत आहे. दररोज 500 च्यावर पॉजिटिव्ह रुग्न आढळत आहेत.बुलढाणा तहसील कार्यलयातील एक जन पॉजिटिव्ह आला होता. त्या आधारे तहसीलदार रूपेश खंडारे यानी एक आदेश काढून कार्यलयातील सर्व कर्मचाऱ्यानी कोरोना चाचणी करावी असा आदेश काढला त्यानुसार तहसील कार्यलयातील तब्बल 60 कर्मचारयांची कोरोना चाचणी कार्यालयातच करण्यात आली. त्यात 23 कर्मचारी पॉजिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी काही काळ तहसील कार्यलयात येऊ नये असे प्रशासनाच्या वतीने कळविन्यात आले आहे . कार्यलयातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे पॉजिटिव्ह मद्धे आलेल्या मद्धे तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, शिपाई आदि कर्मचार्याचा समावेश आहे.

corona positive patient in officetahsil office buldhana