मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 1ऑगस्ट – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी यावेळी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी या योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयात व औद्योगिक आस्थापनेत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केले असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर UPSCने यांची उमेदवारी रद्द