लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या 150 व्या जयंती अनुषंगाने देशभरात होत असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने नुकतीच अँटी करप्शन ब्यूरो, गडचिरोली च्या वतीने गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र – कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेत जनजागृती होण्याकरीता लाच तथा भ्रष्टाचाराबाबत लाच लुचपत विभाग गडचिरोली कडून कार्यशाळा तथा चर्चासत्र आयोजित आले होते.
यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर कार्यशाळेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य, ऊद्देश, तथा लोकसेवकांचा समाजातील भ्रष्टाचार, लाचेचे प्रकार, त्यांचे दुष्परिणाम, याबाबत सविस्तर माहिती देण्यात येऊन लाच मागणी अथवा भ्रष्टाचारा बाबत तक्रार कशी करावी याबाबत ला.प्र.वि.गडचिरोलीचे पोलिस उपअधिक्षक विक्रांत सगणे, यानी सखोल माहिती देऊन कुणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय कामाकरीता लाचेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे करावी असे आवाहन कार्यशाळेत उपस्थीताना केले. तसेच पोलिस निरिक्षक संतोष पाटिल, यानी उपस्थीताचे व विद्यापीठाचे आभार मानुन त्याना ला.प्र.वि.गडचिरोली येथे तक्रार करण्याकरिता सपंर्क माध्यमांची माहिती देवुन जनजागृती, प्रबोधन करण्याकरिता पत्रके वाटून त्यांचे स्थानिक व्हॉट्स अँप ग्रुप वर पत्रके प्रकाशित करण्याची विनंती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यशाळेला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.