अन्न व कृषी संघटना (एफएओ), रोम चा राजा भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार 2020 भारतीय कृषी संशोधन परिषदे ला जाहीर !

मुंबई डेस्क, दि. ६ डिसेंबर: भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) अन्न व कृषी संघटना (एफएओ), रोम द्वारा आंतरराष्ट्रीय  किर्ती चा राजा भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार प्रदान करण्यात आला. एफएओने जागतिक मृदा दिन (5 डिसेंबर 2020) रोजी एका आभासी (virtual) कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली. सुदृढ मातीचे  महत्त्व व त्या विषयीची  जागरूकता वाढवण्यासाठी दर्शविलेल्या  प्रतिबद्धतेसाठी आयसीएआरला ह्या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक मृदा दिन पुरस्कार आयसीएआरला गतवर्षीच्या त्यांच्या जागतिक मृदा दिन सोहळ्यासाठी प्रदान करण्यात आला आहे, ज्यात “मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा” चा नारा देत  परिषदे ने  मृदा स्वास्थ्य चा जागर मांडला होता. परिषदे ने 1-7 डिसेंबर 2019 दरम्यान “मृदा आरोग्य जागरूकता सप्ताह” आयोजित केला होता व त्या अंतर्गत 5 डिसेंबर 2019 ला सोशल मिडियावर  संस्थे चे शास्त्रज्ञ, विविध सरकारी संस्था, अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी वर्गा सह 13,000 हून अधिक लोकांच्या सहभागाने “सॉईल – अवर मदर अर्थ ” नावाने  जनचळवळ उभी केली.

थायलंडची राजकुमारी महाचक्री सिरीधॉर्न च्या हस्ते  बँकॉक मध्ये जानेवारी 2021 मध्ये  होणार्‍या अधिकृत समारंभात आयसीएआरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 
आयसीएआर ही भारतातील कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापनासाठी एक मान्यताप्राप्त संस्था आहे. त्या योगे, जगातील कृषी संशोधन आणि शिक्षण संस्थांच्या सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी आयसीएआर एक घटक आहे व   संपूर्ण देशातील  बागायती, मृदा विज्ञान, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान या क्षेत्रांचे ती प्रतिनिधित्व करते.

देशातील जास्तीत जास्त मृदा भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी मृदा जागरुकता सप्ताहमध्ये आयसीएआर ने सर्व कृषी  विद्यापीठांमध्ये माहीती सत्रांचे आयोजन, शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम, प्रदर्शन, माहीतीपट, फील्ड़ विजिट्स आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले. मुख्यत: युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी विविध  प्रश्न मंच, वादविवाद आणि ऑन-साइट प्रात्यक्षिकं  घेण्यात आली व त्या द्वारे अन्न सुरक्षा आणि हवामान बदल रोखण्याच्या दृष्टी ने मृदा संवर्धना चे महत्त्व  पटवून देण्यावर भर दिला.