लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 1, सप्टेंबर :- आतापर्यंत जेवढ्या निवडणूका झाल्या ,त्या किरकोळ अपवाद वगळता वरळीवर शिवसेंनेचाच झेंडा फडकत राहिला आहे. अनेक महापौर वरळीने मुंबापुरीला दिले. सध्या वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत. याशिवाय विधानपरिषदेवर सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे दोन आमदार आहेत की ज्यांनी विधानसभेवर यापूर्वी प्रतिनिधित्व याभागातून केले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील याच मतदार संघातल्या.
शिवसेनेचा हा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात साजरी होणारी सचिन अहिर यांची दहीहंडी यावर्षी भाजपच्या आशिष शेलारांनी हायजॅक केली. त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होर्डीग्ज झळकत आहेत. एकंदरीत भाजप आणि शिंदे गट याठिकाणी शिवसेनेला डॅमेज कंट्रोल करीत आहेत असे राजकीय तज्ञांचे निरीक्षण आहे. भविष्यात वरळीत मोठा राजकिय आखाडा खेळला जाणार हे निश्चित !
हे देखील वाचा :-