तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र मतदान मला करत नाही : राज ठाकरे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक, 21 मे –मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. स्थानिक मनसेचे पदाधिकारी, शेतकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत.

नाशिकमधील शेतकऱ्यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नाशिक जिल्हा बँक काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत, मात्र काहीसा दिलासा मिळावा अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न करत, ‘तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र मतदान मला करत नाही’, असे खडे बोल देखील सुनावले. राज ठाकरे यांनी आश्वासन देत, लवकरच या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हे पण वाचा :-