नागपूरच्या महापौराविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. २८ नोव्हेंबर:  नागपूर शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरून युवक काँग्रेसने इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयापुढे महापौराविरोधात आज शनिवारी निदर्शने केली. 
या आंदोलनाचे नेतृत्त्व युवक काँग्रेस उपाध्यक्ष वसीम खान यांनी केले. कोरोना रुग्णांचे दररोज आकडे वाढत असताना महापौर स्वत:च्या निवडणूक प्रचारात व्यवस्त असल्यावरून यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी वसीम खान म्हणाले की, नागपूर शहरात दररोज ३५०- ४०० पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी १० पेक्षा अधिक लोकांचे मृत्यू होत आहेत. तर महापौर निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापूर्वीचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना नियंत्रणात ठेवण्याकरिता सतर्वâ होते. ते गेल्यापासून मनपा यंत्रणा सुस्तावली आहे. मुंढे यांची बदली करून नवीन आयुक्त म्हणून राधाकृष्णन् यांना आणण्यात आले. परंतु ते मौन धारण करून बसलेले आहेत. त्याकरिता आयुक्त पदावर पुन्हा तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोना से जनता त्रस्त, महापौर प्रचार में व्यस्त, अशा घोषणा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.