लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि.१२ ऑगस्ट : ग्रामपंचायत आलापल्लीत मन्नेवार कालनीत समीप असलेल्या स्मशानभूमिमध्ये शेडचे उदघाटन जि.प. अध्यक्ष अजय ककांडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. मन्न्नेवार कालनीतील नागरिकांनी जि.प. अध्यक्ष यांच्या कड़े मागणी लावून धरली होती, नागरिकांची समस्या लक्षात घेवून ककांडालवार यांनी ६ महिण्यात काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले,
शेड बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून बांधकाम पूर्ण करून आज नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, सदस्या सुगंधा मडावी तथा माझी सरपंच, सदस्या शारदा कळते , बेझलवार , रजनी गंजीवार, खोबरागड़े ,माजी सरपंच दिलीप गंजीवार तंटामुक्त अध्यक्ष सुरेश गद्दमवार आविस सचिव प्रज्वल नागुलवार चंदू बेझलवार , जूलेख शेख, , अभियंता रामटेके, शंकर ढोलगे ,व इतर पदाधिकरी उपस्थिति होते .. याशिवाय समाजाच्या विकासासाठी आणि मन्नेवार समाजाच्या वसाहतीची पाहणी करून विहिरी , समाजमंदिरसाठी येत्या ३ महिन्यात १५ लक्ष देन्यात येईल असे नागरिकांना आश्वासन देण्यात आले..
हे देखील वाचा ,
चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा