लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितींच्या 28 जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.
19 जुलै रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली होत
राज्य निवडणूक आयोगाने पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी मोठी गर्दी केली होती.
यावेळी उमेदवार आणि समर्थकांची शासकीय कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळली. जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी दरम्यान सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालीय. तर काँग्रेस, भाजप आणि वंचीत बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार आहे.
हे देखील वाचा:
दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय