लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. ११ एप्रिल: आलापल्ली शहरातील नागरिकांना कोविड-१९ ची लस घेता यावी यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा आलापल्ली येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नोडल अधिकारी डॉ. गणेश लाडसकर, आलापल्ली आरोग्य उप केंद्रातील आरोग्य सेविका कुळमेथे, बोधनकर, संगीता महालदार, कु. संबोधित मेश्राम, आशा स्वयंसेविका माया सिडाम, वंदना मडावी तसेच जि.प.प्रा. कन्या शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद सडमेक, टेक्नोसी शिक्षक जगदीश बोम्मावर, सतीश खाटेकर, अनिल चांदेकर, बावणे, संजय येल्लमवार आदींची उपस्थिती होती.