आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात तिरुपती येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजअभावी किमान 11 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तिरुपती डेस्क 11 मे:- आंध्र प्रदेशात तिरुपती येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजअभावी किमान 11 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण रुईया हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होते. ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्यामुळे ही घटना घडली असून व्हेंटिलेटरवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू .

घटनेच्या वेळी हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये आणि ऑक्सिजन बेडवर सुमारे 700 कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू होते. सर्वसाधारण वॉर्डात इतर 300 रुग्ण होते. घटनास्थळी पोहोचलेले चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी सांगितलं, “ऑक्सिजन सिलिंडर्स पुन्हा लोड होण्यास पाच मिनिटं उशीर झाल्याने हा अपघात झाला. यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी (10 मे) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.”

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. घटनेनंतर तात्काळ 30 डॉक्टर आयसीयूमध्ये पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “ऑक्सिजनचा दबाव जेमतेम पाच मिनिटं कमी होता. त्या दरम्यान एक टँकर पोहोचला सुद्धा, पण ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत काही क्षणातच 11 रुग्णांचा मृत्यू झाला.”

रुग्णांचे नातेवाईक प्रमाणे २५ ते ४० मिनिटे ऑक्सिजन पुरवठा बंद होती असा केला जात आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये सतत देखरेख ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

{हे पण वाचा :- स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह }