गुजरात निवडणूकीत ‘आप’ ने उतरविता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहमदाबाद, 04 नोव्हेंबर :- आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी आपला उमेदवार मैदानात उतरविला आहे. इसुदान गढवी असे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी केली. सुमारे 16.5 लाख लोकांची मते त्यांना मिळाल्यानंतर ‘आप’ ने इसुदान यांचे नाव निवडले आहे. ज्यामध्ये 73 टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती असल्याचे म्हटले आहे.

29 ऑक्टोबर रोजी केजरीवाल यांनी जनतेला एसएमएस, व्हाॅसएप, व्हाॅईस मेल आणि ई-मेल द्वारे पक्षाशी संपर्क साधूनराज्यात पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा असे सांगण्याचे आवाहन केले होते. इसुदान गढवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका साधारण परिवारात झाला. त्यांचे वडील खेराजभाई हे शेतकरी असून संपूर्ण कुटूंबही शेती व्यवसाय करते. इसूदान गढवी यांनी पत्रकारिताही केली आहे आणि गुजरातचे लोकप्रिय टीव्ही एन्कर आहेत. जून 2021 मध्ये ते आप मध्ये सहभागी झाले होते. इसूदान गढवी हे सध्या आपचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ही आहेत.

हे पण वाचा :-

aapcandidateelectionsin Gujarat