कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा ४०% ने स्वस्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 फेब्रुवारी: विमानांना लागणार्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल वर लागणारा सेस तर बिलकूल नाही. परवाच्या केंद्रीय बजेटमध्ये जाहीर झालेला कृषी अधिभार सुध्दा फक्त पेट्रोल व डिझेल वर लावला गेला आहे जो विमानाच्या इंधनावर लावला गेलेला नाही , परीणामी ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन 40% ने स्वस्त म्हणजे 55 रु प्रति लिटर आहे. विकासकामांसाठी कर देण्याचा भार पैट्रोल डिझेल वापरणार्या सर्व़सामान्य नागरीकांवर आणि वाहतूकदारांवरच का लावला जातो ? विमानाने प्रवास करणारे त्यांच्यापेक्षा गरीब आहेत का ?

ATF(aircraft tutbine fuel ) Prices in Metros (Rupees/Kl) for Domestic Airlines
Applicable from February 16, 2021

Metros Prices
Delhi 55,737.91
Kolkata 60,165.81
Mumbai 53,856.65
Chennai 56,878.3

महाराष्ट्र राज्य सरकारचा व्हॅट विमानाच्या इंधनावर डिझेलवर लावलेल्या व्हॅट पेक्षा जास्त असूनसुद्धा दरांमध्यै ही तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागणार्या करांच्या पातळीवर आणणे आवश्यक असल्याचे, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले आहे.