न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’ वर झळकला; वाशीमच्या देपूळ येथील ज्ञानेश्वर आघाव..

वाशीम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशीम: जिल्ह्यातील देपूळ गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर आघाव यांनी सिंगापूरमध्ये फोर्स वेदा ही आयटी कंपनी स्थापन करून मोठे यश मिळवले आहे. ज्ञानेश्वर आघाव यांनी ग्राफी कंपनीच्या माध्यमातून सेल्स फोर्स प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेल्या उत्कृष्ट कंटेंटच्या मदतीने एक हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. त्यांच्या कार्याची दखल घेत, न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध ‘टाईम्स स्क्वेअर’ वर त्यांच्या कार्याचा व्हिडीओ व प्रतिमा झळकली आहे.

ही घटना शिक्षित तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली असून ज्ञानेश्वर आघाव यांचे वाशिम जिल्ह्यासह देशभरात सर्वत्र कौतुक होत आहे.

it companytimes squareज्ञानेश्वर आघाव