लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कराची, 03 नोव्हेंबर :- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवाला या ठिकाणी सुरू रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या सोबत असणार्या त्यांच्या एक सहकार्याचा या गोळीबारात मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरले आहे.
पाकिस्तानाच्या गुजरानवाला येथे इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत इम्रान खान देखील सहभागी झाले होते. या रॅलीत अचानक एका हल्लेखोर घुसून त्याने जवळपास सहा ते सात राउंड फायर केले. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. विशेष म्हणजे जखमींमध्ये इम्रान खान ही आहेत. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवल पाकिस्तानच नाही तर जग हादरले आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदी वातावरण आहे. या आधी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान गेनिझिर भुत्तो यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात बेनिझिर भुत्तो यांचा मृत्यू झाला होता.
हे पण वाचा :-