सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, ऑक्सीजन सपोर्ट हटवले

करोना चाचणी निगेटिव्ह, रात्री त्यांच्या तब्येतीत काही चढ उतारही पाहायला मिळाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 03जानेवारी :- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आणि भारतीय संघाचे माजीर कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या सौरव गांगुली शनिवारी 2 जानेवारीला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या बातमीचं सर्वच क्रीडा रसिकांची चिंता वाढली.

सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली आसून चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे आहेत. शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुलीच्या डोळ्यासमोर अचानक अंधार आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.शनिवारीच त्यांची एंजिओप्लास्टीही करण्यात आली. त्यांच्या हृदयाच्या नसांमध्ये स्टेंट घालण्यात आलं होतं. आता गांगुलीची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.

BCCIDadaIndain cricket fans