लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंदीगढ ६ जुलै :- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.
आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. भगवंत मान शादी यांचे लग्न गुरुवारी 7 जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून त्यांची पहिली पत्नी आणि मुले अमेरिकेत राहतात. भगवंत मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांच्या मातोश्री हरपाल यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा त्यांचा संसार थाटावा. आई आणि बहीण यांच्या आग्रहाखातर भगवंत मान लग्नासाठी तयार झाले. भगवंत मान यांच्या मातोश्री आणि बहिण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची निवड केली आहे