मोठी बातमी: आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

बलात्काराच्या प्रकरणात अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्ली :आध्यात्मिक गुरू आसाराम बापू संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 85 वर्षीय आसाराम बापूला सुटकेनंतर आपल्या अनुयायांना भेटू नये, असे निर्देश दिले आहेत. बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असून  तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने आता देखील दिलासा देत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. खोपोलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला खोपोलीत दाखल करण्यात आले होते.

जामीन मिळावा यासाठी आसाराम बापूकडून अनेकदा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी अर्ज दाखल केला असता, केवळ वैद्यकीय कारणाबाबतच विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणांचा विचार केल्या जाणार नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. शिक्षा कमी करण्यासाठी आसारामने विनंती केली होती. पण ही याचिका गुन्ह्याची गंभीरता पाहता टिकली नाही. न्यायालयाने याचिका नामंजूर केली होती. तर आज कोर्टाने आसारामला सशर्त जामीन मंजूर केला.

मुलगा पण तुरूंगात

प्रकरणातील पीडितेच्या बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साईविरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणात नारायण साईला एप्रिल 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामला ज्याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली, त्याचा गुन्हा 2013 मध्ये नोंदवण्यात आला आहे. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या नारायण साई हा तुरुंगात आहे.

Asaram Bapuasaram bapu bail