लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ब्रिटन, 20, ऑक्टोबर :- ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केवळ दिड महिन्याच्या कालावधीत म्हणजे 45 दिवसांतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे इंग्लंडमध्ये मोठा राजकीय भुकंप आला आहे.
लिझ ट्रस सरकार ने मांडलेल्या मिनी बजेट नंतर देशभरात कर रचनेवरून गोंधळ झाला होता. या बजेटवरून ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झाले होते. त्याची परिणीती आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यात झाली आहे.
हे देखील वाचा :-