BSNL ने लॉन्च केले 3 स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लान्स…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था 10 जुलै : भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) 100 रुपयांपेक्षा कमी किमतीतील दोन नवे प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत. हे नवे स्पेशल टॅरिफ व्हाउचर प्लान  सर्व नेटवर्कवर 3 GB हाय स्पीड डेटा आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधा देतात. BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 447 रुपयांचा नवा एसटीव्ही पॅकही समाविष्ट केला आहे. तसंच, 699 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे.

BSNLचे नवे प्लान्स

बीएसएनएलच्या 447 रुपयांच्या प्लानमध्ये युझरला 100 जीबी डेटा दिला जातो. त्यात दररोज किती डेटा वापरावा, याची काही मर्यादा नसते. या प्लॅनमध्ये युझरला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसची सोयही दिली जाते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 60 दिवस असते. यासोबतच युझरला Eros Now चा फ्री अॅक्सेसही दिला जातो.

बीएसएनएलच्या 94 रुपयांच्या नव्या प्लानमध्ये युझरला 90 दिवसांसाठी 3 जीबी डेटा दिला जातो. त्यात युझरला 100 मिनिट कॉलिंगची सुविधाही दिली जाते. ही मिनिटं संपल्यानंतर युझरला एका मिनिटाच्या कॉलिंगसाठी 30 पैसे शुल्क द्यावं लागतं. त्यासोबतच या प्लॅनमध्ये युझरला कॉलर ट्यूनची (Caller Tune) सुविधा 60 दिवसांपर्यंत दिली जाते.

बीएसएनएलच्या 75 रुपयांच्या नव्या प्लानमध्ये 2 GB डेटा आणि 100 मिनिट कॉलिंग या सुविधा दिल्या जातात. त्याची वैधता (Validity) 60 दिवसांची असते. या प्लॅनमध्ये युझर्सना मोफत कॉलर ट्यून सुविधाही दिली जाते.

699 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल

बीएसएनएलने 699 रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता युझरला दररोज 0.5 जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जाणार आहे. हा डेटा संपल्यानंतर डेटा स्पीड 80 kbps होतो. या प्लॅनमध्ये युझरला दररोज 100 एसएमएसची सोयही दिली जाते. PRBT कॉलर ट्यून घेण्याची सुविधाही युझरला या प्लॅनसोबत मिळते. बीएसएनएलच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 180 दिवस अर्थात सहा महिन्यांची आहे.

बीएसएनएलने 699 रुपयांचा हा प्लॅन प्रमोशनच्या (Promotional Plan) हेतूने सादर केला आहे. तो नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. युझर्सनी नोव्हेंबर महिन्याच्या आधी हा प्लॅन घेतला, तर त्यांना 160 दिवसांऐवजी 180 दिवसांची वैधता दिली जाणार आहे.

 हे देखील वाचा  :

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला

चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले तब्बल १९५ ध्वज

 

BSNLIndialead story