लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर :- देशातील 6 राज्यात 7 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीचे निकाल आज रविवारी हाती आले आहेत. यात भाजपाला काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी जेरीस आणले. तर या पोटनिवडणूकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे चार जागा काबिज केल्या तर इतर काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी भाजपाला आव्हान दिले आहे. यामध्ये एक जागा शिवसेना ठाकरे गट तर दुसरी जागा राजदने जिंकली आहे.
तेलंगणा राज्यातील मुनुगोडे जागेवरून भाजप आणि टीआरएसमध्ये जोरदार रंगत पहायला मिळाली. गेल्या अनेक फेर्यात टीआरएसचा उमेदवार आघाडीवर आहे. बिहारमधील मोकामा, गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, तेलंगाणातील मुनुगोडे, उत्तरप्रदेशातील गोला गोकर्णनाथ, ओडीशातील धामनगर, हरियाणातील आदमपूर या सात विधानसभा जांगासाठी पाटनिवडणूक झाली होती. तेलंगाणा वगळता इतर ठिकाणाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये राजदच्या नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांचा पराभव कला आहे. गोपाळगंजच्या जागेवर भाजपाच्या कुसूम देवी यांनी राजदच्या मोहन प्रसाद गुप्ता यांना पराजित कर महाआघाडीला धक्का दिला. त्यामुळे बिहारमधील येत्या काही दिवसात सत्ता संघर्ष तीव्र होईल असे दिसून येते. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व जागेवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी बाजी मारीली. या निवडणूकीत भाजपासह शिंदे गटाने उमेदवार दिला नव्हता. पणया निवडणूकीत नोटा ला 12,806 मते मिळाल्यान चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेेेशातील लखीमपूर खीरी, ओेडिशातील धामनगर, हरियाणातील आदमपूर तर गोपाळगंज या जागेवर भाजपाच्या उमेेदवारांनी विजयश्री खेचून आणला आहे.
हे पण वाचा :-