सेंट्रल रेल्वेचे ‘व्यवसाय विकास युनिट्स (बीडीयू)’ नव्या संधीसह रेल्वेचा व्यवसाय वाढवीत आहेत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि.१० नोव्हे :- मध्य रेल्वेने महिंद्रा ऑटोमोबाईल्स कळंबोली येथून बांगलादेशातील बेनापोल येथे, मका भुसावळ ते बांगलादेशातील दर्शना येथे, नागोठणे येथून स्टील पाईप्स तिनसुकीया येथे, महिंद्राची वाहने नाशिकहून चितपूरकडे नेण्यात आली. सर्वात लोकप्रिय किसान रेल्वे व्यतिरिक्त आता नागपूरहून संत्रा रेल तसेच बडनेरा ते पोलाची पर्यंत सोया बियाणे आणि फ्रेट / पार्सल लोडिंग पॉईंट्स म्हणून प्रथमच नवीन स्थानके सुरू करण्यात आली. त्याप्रमाणेच गुना, जामनगर इत्यादी नवीन ठिकाणासाठी मालवाहतूक केली गेली. हा सर्व नवीन व्यवसाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील व्यवसाय विकास युनिटच्या सखोल विपणनामुळे शक्य झाला.

मध्य रेल्वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास विभाग विविध मालवाहतूक संस्था, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत. बीडीयूच्या या उपक्रमांमुळे नवीन व्यवसाय मिळाला आणि नव्या व्यवसायासाठी व्यापार आणि उद्योगाशी संबंध प्रस्थापित झाला. बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींसोबत नवीन प्रस्तावांची आणि लवचिक योजनांची आक्रमकपणे जाहिरात करीत त्यांच्या मागण्या एकत्रित करते.

मुंबई विभागातील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने २३ एनएमजी द्वारा कळंबोली ते बेनापोल येथे ऑटोमोबाईलचे लोडींग नुकतेच सुरू केले आहे, स्टील पाईप्सचा एक रेक नागोठाणे ते तिनसुकीयासाठी भरला गेला. पुणे विभागातील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने त्यांच्या अथक प्रयत्नातून ऑटोमोबाईल वाहतुकीस पुन्हा आपल्याकडे आकर्षित करीत मालवाहतुकीत प्रचंड वाढ केली आणि एकूणच कामगिरी आणि विभागाच्या उत्पन्नात भर पाडली. ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या या आर्थिक वर्षातील मागील ७ महिन्यांत, ४६ एनएमजी रॅक्समध्ये ऑटोमोबाईलची वाहतूक केली गेली जी २०१९-२०२० च्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या ऑटोमोबाईल लोडिंगच्या कामगिरीइतकी आहे. पुणे विभागातील बीडीयू टीम सतत संपर्क साधत असल्यामुळे येत्या पाच महिन्यांत वाहन वाहतुकीस मोठा वाव आहे. भारतीय रेल्वेने सादर केलेल्या मिनी रेकच्या आकर्षक नवीन फ्रेट पॉलिसीमुळे १५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराकरिता प्रथमच कळमेश्वर ते आझरा (एनएफआर) कडबा; बडनेरा ते तामिळनाडूच्या पोलाची येथे सोयाबीज, खंडवा ते परभणीपर्यंत गहू लोडींग करण्यात आले. भुसावळ गुडशेड वरून दर्शना (बांगलादेश) येथे प्रथमच मका निर्यातीसाठी ३ इंडेंट करण्यात आली. नागपूर विभागात ४ वर्षानंतर गव्हाची वाहतूक बेतुल गुडशेड येथून पुन्हा सुरू झाली. अजनी ते फिलौर, फिरोजपूर करीता ट्रॅक्टर लोडिंग तसेच बादली येथून गुना, जामनगरला जाण्यासाठी सिमेंट लोडिंग या नव्या ठिकाणासाठी झालेली आहे. रावेर / सावडा/निंभोरा येथून केळीची वाहतूक करण्यासह, फ्रेट/पार्सल लोडिंग इंडेंट मध्ये वाढ होत आहे, आहे. बीडीयूच्या प्रयत्नांना बळ म्हणून बडनेरा स्टेशन कायमस्वरुपी पार्सल वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे. बांगलादेश व इतर ठिकाणी कापड, कापूस, बियाणे आणि धाग्याच्या वाहतुकीसाठी हिंगणघाट हे पार्सल टर्मिनल म्हणून उघडले गेले आहे.

लवचिक योजना, कमी दर, वेगवान वाहतूक, संरक्षित व सुरक्षित वाहतूक आणि विशेष म्हणजे पर्यावरणास अनुकूलतेमुळे वस्तू व मालाच्या वाहतुकीसाठी उद्योगजगत रेल्वे वाहतुकीसाठी अधिक स्वारस्यपूर्ण व इच्छुक आहे.