पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री ठाकरे करणार का लॉकडाऊनची घोषणा?

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन नको ही भूमिका घेतली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 21 एप्रिल :– लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की कायम ठेवणार याकडे लक्ष लागले.

राज्यात करोनाची वाढती संख्या कमी होत नाहीये. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने उद्यापासून कडक लॉकडाऊन लागू होणार याबाबतची घोषणा केली आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

यात लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. त्याच बरोबर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवा ही भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णय वर ठाम राहत का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

covid second wavecovid wareemergnacylockdownmodiuddhav