तटरक्षक दलाने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांची केली सुटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग : भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे.

गोव्यातील चेतक हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली. हे दीपगृह सिंधुदुर्ग जवळ भर समुद्रात असून तौक्ते चक्रीवादळाचा थरारक अनुभव या कर्मचाऱ्यांना आला. तटरक्षक दलाच्या जवानांनी या दोघांची थरारकरित्या काल सायंकाळच्या सुमारास सुटका केली आहे.

या दोघांना यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आले. तौक्ते वादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि बदलत्या हवामानामुळे खवळलेला समुद्र यामुळे येथील विद्युतदपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. तसेच, या दीपगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा :

तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – मंत्री विजय वडेट्टीवार

अरबी समुद्रात ‘बार्ज P- 305’ वरील रेस्क्यू ऑपरेशन थरार सुरूच

जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

 

Bhartiy Tatrakshaklead story