- २४ तासात ३.९२ लाख नवे बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २ मे: देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने आता भयंकर रूप घेतले आहे. मागील १० दिवसापासून लागोपाठ दररोज ३ लाखापेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी या विक्रमाने ४ लाखाचा आकडा सुद्धा ओलांडला होता. मात्र, मागील २४ तासात पहिल्यांदा असे झाले आहे की, बरे झालेल्या रूग्णांचा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला आहे. शनिवारी २४ तासात ३ लाख ८ हजार ५२२ लोक बरे होऊन घरी परतले. कोरोनाने शुक्रवारी थोडा दिलासा दिला आहे. देशात मागील २४ तासात ३ लाख ९२ हजार ४५९ नवीन रूग्ण समोर आले. या दरम्यान ३,६८४ लोकांचा मृत्यू झाला.
४६% भारतात सापडले
यापूर्वी शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या संख्येने सर्व विक्रम तोडले होते. शुक्रवारी एका दिवसात देशात ४ लाख १ हजार ९११ नवीन संक्रमित सापडले. हा जगातील कोणत्याही देशातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. मागील २४ तासात संपूर्ण जगात ८.६६ लाख नवीन रूग्ण सापडले, ज्यापैकी निम्मे म्हणजे ४६% भारतात सापडले आहेत.
महाराष्ट्रात ६३,२८२ नवीन प्रकरणे
देशात कोरोनाने सर्वात प्रभावित महाराष्ट्र दिसत आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोविड-१९ ची ६३,२८२ नवीन प्रकरणे समोर आली, तर महामारीमुळे आणखी ८०२ रूग्णांचा मृत्यू झत्तला. आरोग्य विभागानुसार राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची एकुण संख्या ४६,६५,४७२ वर पोहचली आहे, ज्यापैकी ६९६१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची ६२,९१९ नवीन प्रकरणे आली होती तर ८२८ लोकांचा मृत्यू झाला होता.
दिल्लीत विक्रमी संख्या
दिल्लीत शनिवारी कोरोनाची २५,२१९ नवीन प्रकरणे समोर आली तर सर्वाधिक ४१२ रूग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत संसर्ग दर ३१.६१ टक्के झाला आहे.