खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भावनिक ट्वीट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई, दि. 16 मे :- काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – देवेंद्र फडणवीस

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली.

राजीव सातव मध्ये आम्ही आमचा एक उज्वल सहकारी गमावला.

congress ledersrahul gandhiRajiv satavsonia gandhi