काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन

सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते.

पुणे डेस्क 16 मे:- काँग्रेसचेे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने त्यांना शनिवारी पहाटे पासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातच जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते.

राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.

खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती तसंच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती. सायटोमॅगीलोनं ग्रासल्यानं त्यांचं निधन झालं.

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते.. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान,” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली

congress MP rajiv satav delthCongrss Lederscovidrahul gandhiRajiv satav