भाजप नेता रमेश बिधूडी यांचे वादग्रस्त विधान….. तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या गालांप्रमाणे बनवू !

कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांघी यांच्याविषयी वादग्रस्त विधान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच  दिल्लीतील  वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालकाजी विधानसभा मतदारचे भाजपचे  उमेदवार रमेश बिधूडी यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या विषयी  वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे. आप आणि काँग्रेसनंतर आता भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली असून  रोज राजकीय वादविवाद आणि विधानांची मालिका पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमा दरम्यान भाजपचे  उमेदवार  रमेश बिधूडी म्हणाले की, “लालू यादव खोटं बोलायचे की ते बिहारच्या रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालांप्रमाणे बनवतील. पण ते तसं करू शकले नाहीत. मात्र, मी तुम्हाला आश्वासन देतो की, कालकाजी सुधार शिबिरासमोरील आणि आतील सर्व रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू.”

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी बिधूडी यांच्या विधानाला महिलाविरोधी ठरवलं आहे., “प्रियंका गांधी यांच्याबाबत रमेश बिधूडी यांनी केललं विधान केवळ लाजिरवाणंच  नाही, तर त्यांची महिलांविषयीची नीच मानसिकता दाखवत आहे.. ज्या व्यक्तीने संसदेत आपल्या सहकारी खासदाराला नालस्ती केली आणि त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही, त्याच्याकडून दुसरं काय अपेक्षित असणार?”

काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी “ही केवळ या माणसाची मानसिकता नाही तर त्यांच्या वरिष्ठांचे खरे स्वरूप असून  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणाची दिशा दाखवते. हेच  भाजपचे खरे रूप असून  प्रत्यक्षात, महिला विरोधी विचारांचा पाया मोदींनीच घातला आहे. त्यामुळे या नीच विचारांसाठी  त्यांच्या नेत्यांकडून दुसरं काय अपेक्षा ठेवायची?

हे ही वाचा,

प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम ही काळाची गरज

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

 

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

 

 

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी बिधूडी यांच्या विधानाला महिलाविरोधी ठरवलं आहेकालकाजी विधानसभा मतदारचे भाजपचे  उमेदवार रमेश बिधूडी यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या विषयी  वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.