जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना विरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेडचक्का येथील महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे काश्मीर मध्ये आपले कर्तव्य बजावताना असतांना द्रास टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढीग पडून त्यांना वीरमरण आले.

बुलडाणा १७ डिसेंबर :- वीर जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण झाल्याची माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला १५ डिसेंबरला रात्री कळविण्यात आली. औरंगाबाद येथे त्यांची विरमाता शिवनंदाताई गंभीर आजारामुळे भरती असताना या धक्कादायक घटनेने हे कुटुंब अक्षरशः हादरले. विर जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण आल्याची बातमी गावात पसरताच पळसखेड चक्का गावात शोककळा पसरली आहे . विर जवान प्रदीप यांच्ये वडील साहेबराव मांदळे यांनी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते .त्यातील मोठा मुलगा प्रदीप, आणि  संदीप हे सैन्यातच कार्यरत आहे त्यातील प्रदीप २००८-०९ मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला जवान प्रदीप मांदळे हे गत ऑगस्ट महिन्यात १५ दिवसांच्या सुटीवर गावी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह ती अल्प सुटी घालविली आणि परत सेवेत कार्यरत झाले होते . मात्र ती भेट शेवटची ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल, पण दुर्दैवाने ती अखेरचीच भेट ठरली जवान प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन मुलगा सुरज, सार्थक, जयदीप हे मुले आहेत त्यांचे पार्थिव १८ डिसेंबर रोजी पळसखेड चक्का येथे पोहचेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.