कोरोनाचा मुंबईतला वेग मंदावला तर दिल्लीत थैमान सुरु!

  • राजधानी दिल्ली आता कोरानाची राजधानी बनतेय.
  • दिल्लीत दिवसाला 7 हजार पेक्षा जास्त केसेस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दिल्लीत काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत तब्बल 7174 नवे कोरोनाबाधित नोंदवण्या आले आहेत. आजवर संपूर्ण देशात 24 तासात वाढलेली हा सर्वात मोठा आकडा आहे. दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये 7002 रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीने त्याच्या पुढेही मजल मारली आहे.

जुलै महिन्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण केलं म्हणून दिल्ली मॉडेलची चर्चा सुरु होती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. ज्या दिल्लीत अगदी मागच्या दहा दिवसांपर्यंत दिवसाला दोन-अडीच हजार पेशंट सापडत होते, तो आकडा वेगाने दुप्पट तिप्पट होऊ लागला आहे.

केजरीवाल सरकार ने वाढता करोना रोखण्यासाठी राज्यात फटके बंदी घातली असून दिल्लीत वाढता वायु प्रदूषण मुळे कोरोनावर नियंत्रणा बाहर  गेला आहे. वाढती थंडी, प्रूदषण आणि सणासुदीच्या तोंडावर लोकांचा निष्काळजीपणा अशी तीन कारणं दिल्लीतल्या वाढीमागे सांगितली जात आहेत. पुढचे तीन महिने दिल्ली, उत्तर भारतासाठी धोक्याचे आहेत असंही तज्ज्ञ म्हणत आहेत. त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व बंधनं तातडीने शिथील केली होती. मुंबईत आता कुठे हॉटेल, रेस्टाँरंट सुरु आहेत. दिल्लीत ती सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती. दिल्लीतली मेट्रोही 7 सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती.

delhi covid high