केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि,२३ फेब्रुवारी :  एटापली तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र असलेल्या कोठी, कोठी टोला,पाडोर, तोमारकोर्ठी  आणि मुरुमभुशी या गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37 व्या तुकडीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.37 व्या तुकडीचे कमांडेंट मोहनदास खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांना विविध आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यातआले.

 

देश विदेशातील घडामोडी व विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील लोकांना होण्यासाठी रेडिओ संच वाटप करण्यात आले.त्यासोबत सोलर लॅम्प,ब्लॅंकेट व छत्री चे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमात सहाय्यक कमांडेंट संतोष यांनी गावकऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेऊन केंद्र सरकार,केंद्रीय राखीव पोलीस दल व स्थानिक पोलीस यांच्या वर विश्वास ठेवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयन्तरत राहु असे म्हटले.

या कार्यक्रमादरम्यान निरीक्षक राजकुमार, पीएसआय संजय जरथ, कोठी पोलिस चौकी आणि सीआरपीएफ आणि पोलिसांचे जवानांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा ,

 

आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद संस्था, चिकित्सकांनी संकल्प करावा: राज्यपाल

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक ऐक्याचे प्रेरणास्तोत – केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक: वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई

comandent mohandas khobragadeips ankit goyal