हजारो रुग्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टरचं कोरोनानं निधन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी संचालक आणि पद्मश्री डॉ. के के अग्रवाल यांचं सोमवारी रात्री निधन झालं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 18 मे :- इंडियन मेडिकल असोसिएशनचे  माजी संचालक आणि पद्मश्री डॉ. के के अग्रवाल यांचं सोमवारी रात्री निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून तो कोरोनासोबत लढा देत होते. संसर्ग गंभीर झाल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. के के अग्रवाल यांनी स्वत: काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरद्वारे माहिती दिली होती, की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचं निधन हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठा तोटा आहे.

डॉ. के के अग्रवाल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘डॉ केके अग्रवाल यांचं 17 मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या कोरोनासोबत मोठी झुंज दिल्यानंतर निधन झालं आहे. डॉक्टर झाल्यापासून त्यांनी आपलं जीवन लोक आणि आरोग्यविषयक जागरुकतेसाठी समर्पित केलं.

आईएमए ने सोमवारी 24 तासामध्ये 50 डॉक्टर कोरोणा मूत्यू झाल्याची माहिती दिली आहे. आईएमए प्रमाणे आता पर्यंत
दुसऱ्या लहर मध्ये 244 डॉक्टर कोरोना मूत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
covid dealthcovid second wavedoctor contributiondr K K agrawal