लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 02 नोव्हेंबर :- रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-रूपी व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट सुरू असून त्यामध्ये 9 बॅंकांचा सहभाग आहे. लवकरच सर्वसामान्य ग्राहक देखील डिजिटल चलनाचा वापर करू शकतील असे शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.
डिजिटल चलनाविषरूी देशभरात उत्सुकता आहे. यासाठीचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला असून रिझव्र्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सेंट्रल बॅंक डिजिटल चलनामुळे व्यवसायाच्या पध्दतीमध्ये मोठा बदल घडेल. एफआयबीएसी ही वार्षिक बॅंकिंग परिषद आहे. जी फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ काॅमर्स एन्ड इंडस्ट्री आणि इंडियन बॅंक्स एसोसिएशन द्वारे आयोजित केली. यामध्ये बोलतांना त्यांनी डिजिटल चलनाविषयी महत्वाची माहितीही दिली.
पायलट प्रोजेक्ट सुरू झाल्यावर चाचणीच्या पहिल्या दिवशी बॅंकांनी सरकारी सिक्यूरिटीज व्यवहारांमध्ये 275 कोटी रूपयांचे पेमेंट डिजिटल चलनात करण्यात आल्याची माहिती ही देण्यात आली. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांनाही ई-रूपीची सुविधा उपलब्ध करून देउ. डिजिटल चलनाची पारदर्शकता राखण्यासाठी काम सुरू असून लवकरच त्याचा देशभरात वापर सुरू होईल. मात्र खुप घाई करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
हे देखील वाचा :-