लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मध्य प्रदेशमघील रीवा येथे एका भावाने बहिणीचा विनयभंग केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपी भावाने विनयभंग करणाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच चाकूने गळा चिरून त्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली.
21 एप्रिल रोजी रीवा शहरातील चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील सांची पार्लरजवळील खैरा बस्ती येथील हिरालाल कोल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. मारेकऱ्याने हिरालाल कोळ यांची निर्घृण हत्या केली होती. मारेकऱ्याने हिरालाल कोल यांचा केवळ गळाच नाही तर त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.त्यात पोलिसांना आठ महिन्यांनंतर यश आले. पोलिसांनी १९ वर्षीय कृष्णा उर्फ छोटू विश्वकर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता पोलीस चौकशीत कृष्णाने गुन्ह्याची कबुली दिली. कृष्णाने पोलिसांना सांगितले की, हिरालाल कोल हा त्याच्याकडे प्लंबर म्हणून काम करायचा. एके दिवशी त्याची बहीण त्याला भेटायला आली असता हिरालाल कोळ याने तिचा विनयभंग केला.
यानंतर त्याने हिरालालला मारण्याचा विचार केला. 20 एप्रिल रोजी कृष्णाने हिरालाल कोल याला दारू पाजली आणि तो दारूच्या नशेत असताना त्याने चाकूने त्याची हत्या केली. आरोपी हा हिरालालचा इतका द्वेष करत असे की त्याने रागाच्या भरात त्याचे प्रायव्हेट पार्टही कापले.
दोघेही बसून दारू प्यायचे पण बहिणीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर कृष्णा तिचा खूप तिरस्कार करू लागला. कृष्णाने रणनीती म्हणून हिरालालचा खून केला. हत्येनंतर पोलीस सातत्याने आरोपीच्या शोधात होते. 8 महिन्यांनंतर आरोपीचे गुपित उलगडले व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
हे ही वाचा,
सरसकट पासचे धोरण शासनाने केले रद्द,आता पाचवी व आठवीचा मार्ग सरळ, सोपा नाही !