लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. १० जुलै : चिंचोडी- लांडेवाडी ता. आंबेगाव येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.
दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले. मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्ष ११ महिन्याची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
१५ जून रोजी तिने १९५ देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ तीन मिनिटे दहा सेकंद इतक्या जलद गतीने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याद्वारे तिने जागतिक विक्रमला गवसणी घातली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन विक्रमांना तिने गवसणी घातली आहे.
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे. कोणतीही गोष्ट स्वयंस्फूर्तीने आत्मसात करण्यासाठी ईशानवीमध्ये असलेली जिद्द व चिकाटी कौतुकास्पद आहे. अशी प्रतिक्रिया तिची आई निता आढळराव व भाऊ आराध्य आढळराव यांनी व्यक्त केली आहे. जागतिक विक्रमाची नोंद केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आंबेगाव तालुक्याचे नाव इशान्वी मुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचे चिंचोडी देशपांडे येथील नागरिक चर्चा करत आहे.
हे देखील वाचा :
१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश
३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई
भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू